भाजप आमदाराकडून शिवसेना मंत्री लक्ष्य

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांना आरोग्यमंत्री जबाबदार असल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विधानसभेत फरांदे यांनी हा विषय मांडून आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भ सेवा रुग्णालयातील तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Does the government want to resolve the Pathi dispute or not
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाही?
homeopathic doctors allows to prescribe allopathic medicines
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?

रुग्णालयातील समस्यांबाबत आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करीत बुधवारी फरांदे यांनी विधानसभा सभागृह आणि सभागृहाबाहेर आक्रमक भूमिका घेतली होती. आरोग्य खाते शिवसेनेच्या ताब्यात आहे. वेगवेगळ्या समस्यांच्या भोवऱ्यात संदर्भ सेवा रुग्णालय सापडले आहे. या रुग्णालयाबाबत आरोग्यमंत्री गंभीर नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला. अथक पाठपुराव्यानंतर २३ मार्च रोजी आरोग्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली. दोन तास चर्चा करून कोणताही निर्णय झाला नाही. रुग्णालयाकडे १८ कोटीचा  निधी पडून आहे. तो खर्च करण्यास परवानगी मिळाली तरी रुग्णालयाचे अनेक प्रश्न सुटू शकतात.

ही रक्कम खर्च करणे हा मंत्रिमंडळ बैठकीचा विषय नसून आपल्या खात्याचा विषय असल्याचे आरोग्यमंत्री सांगतात. तीन वर्षे वारंवार मागणी करूनही ही रक्कम खर्च करण्यास परवानगी का दिली नाही, असा प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला. सभागृहात आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्यमंत्र्यांची तक्रार केली. संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आजच्या स्थितीला आरोग्यमंत्रीच जबाबदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

रुग्णालयासंबंधीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या रुग्णालयाला नियमित देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्यात आरोग्य विभाग अपयशी झाल्यामुळे आज रुग्णालयातील ‘लिफ्ट’, वातानुकूलीत यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे रुग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने त्यांच्या समोर दिशाभूल करणारी माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी देतात. बैठकीत चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी आरोग्य विभागाला दिले असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

रूग्णालयातील १६ यंत्रसामग्री, उपकरणे बंद

संदर्भ सेवा रुग्णालयातील लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा यासह १६ यंत्रसामग्री सध्या बंद आहे. केंद्र सरकारने संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग आणि मूत्रपिंड शस्त्रक्रिया केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली असूनही त्यासाठी या रुग्णालयात येथे दोन वाढीव मजले बांधण्याच्या प्रस्तावास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. शिवसेनेच्या मतदारसंघात अंदाजपत्रकाचे तुकडे केले जात असतांना संदर्भ सेवा रुग्णालयाचा प्रस्ताव मात्र उच्चस्तरीय समितीकडे पाठविला गेल्याची तक्रार फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नाशिककरांना मिळू न देण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader