मालेगाव: दैनिकात १७८ कोटीच्या घोटाळ्याची बातमी प्रसिध्द केल्यावरुन पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे येथील न्यायालयात सोमवारी गैरहजर राहिले. राऊत यांना चार नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिलावात निघालेला तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना खरेदीच्या नावाने शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून पालकमंत्री दादा भुसे यांनी घोटाळा केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. या माध्यमातून भुसे यांनी १७८ कोटींची माया जमविल्याचाही राऊत यांचा दावा होता. गेल्या २२ जून रोजी यासंबंधीची बातमी सामना वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. ही बातमी खोटी असून त्यामुळे आपली बदनामी झाली,असा आक्षेप घेत भुसे यांनी ॲड. सुधीर अक्कर, ॲड. योगेश निकम यांच्यामार्फत येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंत सिंग संधू यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या प्राथमिक चौकशीत तक्रारदार भुसे यांच्या नावलौकिकाला बाधा येईल, या हेतूने बातमी प्रसिद्ध झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा निष्कर्ष न्यायमूर्तींनी काढला. त्यानुसार राऊत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा आदेश दिला होता. तसेच राऊत यांनी २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमक्ष हजर राहून याप्रकरणी खुलासा करण्यासही बजावण्यात आले होते.

हेही वाचा… धुळ्याजवळ नाल्यात गांजा शेती, दोन लाखांची झाडे जप्त

न्यायालयाच्या आदेशानुसार राऊत हे न्यायालयात हजर राहतील का, याविषयी उत्सुकता होती. मात्र शिवसेनेतर्फे मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्याचे कारण देत राऊत हे न्यायालयात गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने ॲड.काळे हे न्यायालयात उपस्थित होते. ही गैरहजेरी मान्य करत आता चार नोव्हेबर रोजी स्वत: राऊत यांनी हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.