शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त एरंडोल येथील जाहीर सभेत आमदार चिमणराव पाटील यांच्यावर आक्षेपाह्य टीका केल्यावरून युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध एरंडोल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: चालकाला मारहाण करुन मद्यसाठा असलेल्या वाहनाची चोरी

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

धरणगाव येथे कोळी यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाविषयी खालच्या पातळीवरून टीका करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढत कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली, तर नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच ते जिल्ह्यातून पसार झाले.

हेही वाचा >>>जळगाव: सुषमा अंधारेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांविरोधात ठाकरे गटाची निदर्शने

कोळी यांनी आधी एरंडोल येथील जाहीर सभेत आमदार चिमणराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र जाधव, राजेंद्र चौधरी आणि शालिग्राम गायकवाड यांनी एरंडोल येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader