नाशिक : शहरासह जिल्ह्यात इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाली असून लवकरच रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रियाही पूर्ण करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत १४ हजार ६८१ जागा रिक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नाशिकसह अन्य विभागांत आभासी पद्धतीने इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्यक्ष पद्धत तर शहर परिसरात आभासी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. आभासी प्रक्रियेत शहरातील ६३  महाविद्यालये सहभागी झाली आहेत. जिल्ह्यात २६ हजार ४८० जागा उपलब्ध असून पहिल्या दोन फेरीत आतापर्यंत ११ हजार ७९९ जागांसाठी प्रवेश झाला आहे. तिसऱ्या नियमित फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची २२ ऑगस्टला यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपर्यंत निवडलेल्या महाविद्यालयांमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.  दोन प्रवेश फेऱ्यांनंतर आता तिसऱ्या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय दाखल करण्यासाठी १८ ते २० ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. २१ ऑगस्टला विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या पर्यायांची छाननी करून तिसऱ्या फेरीची यादी तयार केली जाणार आहे. २२ ऑगस्टला तिसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थी आणि त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानुसार या यादीतील विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्यानंतर २५ ऑगस्टला महाविद्यालयांना पुढील प्रवेशासाठी रिक्त जागांची यादी जाहीर करावी लागणार आहे. याच वेळापत्रकाप्रमाणे द्विलक्षी आणि कोटा प्रवेश प्रक्रियाही राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.