नाशिक – मेरी मिट्टी मेरा अभिमान उपक्रमातंर्गत शिक्षण विभागाकडून सेल्फी विथ मिट्टी अभियान राबविण्यात येत असून बुधवारी या अभियानाचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीजास्त छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्यासाठी दिवसभर शिक्षकांना धडपड करावी लागली.

मेरी मिट्टी मेरा देश मोहिमेतंर्गत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील माती अमृत कलशांच्या माध्यमातून राजपथावर नेण्यात आली असताना शिक्षण विभागाच्या मेरी मिट्टी मेरा अभियान- सेल्फी विथ मिट्टी या उपक्रमाचा बुधवार हा अखेरचा दिवस होता.

fee structure photo viral
शाळेच्या मुलांसाठी एवढी फी? फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटिझन्स म्हणतात, “पॅरेंट ओरिएंटेशन फी..”!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Hilarious School Days Video: students were dancing when teacher looked back watch what happen
याला म्हणतात शिक्षकांचा दरारा! बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच… Video एकदा पाहाच
The recipe of the syrup was told by the boy
निरागस चिमुकला सरबत बनवण्याची रेसिपी सांगितल्यानंतर असं काही म्हणाला… ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू
Amravati district female teacher
अमरावती: शिक्षिकांचा अभाव, अल्‍पवयीन मुलींच्या समुपदेशनात अडथळे
primary teachers across maharashtra take leave for protest
विश्लेषण : शिक्षकांनी रजा घेऊन आंदोलन का केले?
district administration is refusing to release teachers from BLO work
शिक्षण विभागाने सुटका करूनही शिक्षक बीएलओ कामात अडकलेलेच
opportunities after CTET Exam
शिक्षणाची संधी : सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट

हेही वाचा >>> नाशिकमध्ये ‘मिशन ब्लड: नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ अभियान – वाढदिवशी रक्तदान करण्याचे आवाहन

सध्या सहामाही परीक्षेचा काळ आहे. महाविद्यालय स्तरावरही विविध प्रकल्प जमा करणे तसेच परीक्षांचा काळ सुरू आहे. शाळा स्तरावर प्राथमिक विभागात मूल्यमापन संकलित चाचणीचा सावळागोंधळ निस्तरतांना मुख्यध्यापकांच्या नाकी नऊ आले आहे. सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या अनुषंगाने परीक्षा प्रलंबित आहेत. याशिवाय सहामाही परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. अशा स्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सेल्फी संकेतस्थळावर टाकण्यासाठी लागणारा वेळ हा शिक्षक तसेच मुख्यध्यापकांच्या संयमाची परीक्षा पाहणारा आहे.

अमृत कलशाच्या माध्यमातून माती आधीच पाठविण्यात आली असल्याने या छायाचित्रांचे करणार काय, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांनी मातीसोबत, मातीच्या ढिगाऱ्यासोबत तसेच काहींनी तर दगडासोबतही छायाचित्रे काढली आहेत. शिक्षकांनी वेळ वाचावा यासाठी समुह छायाचित्रे घेतली. परंतु, ती संकेतस्थळाने नाकारली.

हेही वाचा >>> जळगाव : आदिवासी कोळी आंदोलकांचा जळगाव जिल्ह्यात रास्तारोको; उपोषणकर्त्या महिलांसह पुरुषांच्या प्रकृतीत बिघाड

दरम्यान, अधिकाधिक सेल्फी संकेतस्थळावर टाकाव्यात, यासाठी शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडून सातत्याने भ्रमणध्वनीवर दिवसभर सूचना येत राहिल्या. मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर यासाठी दबाव आणण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

नाशिक विभागातील ४६,३५१ शाळांमधील दोन लाख ७८, ७५३ विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत या उपक्रमात सहभाग घेतला. जागतिक पातळीवर या उपक्रमाची नोंद घेतली जावी यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या सुचनांनुसार शिक्षण विभागाचे काम सुरू आहे.

– डॉ. बी. बी. चव्हाण (शिक्षण उपसंचालक, नाशिक)