लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरापासून जवळच असलेल्या गंगापूर धरण परिसरात मंगळवारी दुपारी फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन मित्रांच्या गटातील १८ वर्षाच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. सावरगाव भागातून धरणाच्या प्रतिबंधित फुगवटा भागात अनेकांकडून प्रवेश केला जातो. या परिसरात यापूर्वी अशा अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. या भागात थेट धरणाच्या पाण्यापर्यंत पोहोचणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने दुर्घटनांची मालिका कायम आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

या दुर्घटनेत जय रमेश चक्रधर (१८, महात्मानगर) या युवकाचा मृत्यू झाला. जय आणि त्याचे मित्र फिरण्यासाठी गंगापूर धरणावर गेले होते. गिरणारे रस्त्यावरील धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आहेत. तिथून धरण क्षेत्रात परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन युवक आणि पर्यटक सावरगाव, गंगावऱ्हे भागातून धरणावर पोहोचतात. सध्या धरणात निम्म्याहून कमी जलसाठा आहे. काही भागात गाळमिश्रित पाणी आहे. त्याचा कुठलाही विचार न करता पर्यटक पाण्यात उतरतात. त्यामुळे दुर्घटना घडते. काहीसा तसाच प्रकार यावेळी घडला.

आणखी वाचा-नाशिक: उड्डाण पुलावरील अपघातात मायलेकींचा मृत्यू, तीन जण जखमी

शहरातील चार मित्र धरणावर फिरायला गेले होते. त्यात जयसह त्याच्या भावाचाही समावेश होता. चौघांपैकी कुणालाही पोहता येत नव्हते. जय पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचा एक मित्रही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. पण तोही बुडू लागला. सुदैवाने तो सुरक्षितपणे बाहेर पडला. मात्र जय पाण्यात अडकून होता. इतरांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ही बाब या भागात वास्तव्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रशिक्षण संस्थेतील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती संस्थेतील मुख्य फायरमन प्रशिक्षक अभिजित बनकर यांना दिली. बनकर यांनी क्षणाचाही विलंब न करता मोटारीतून धरणाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती सातपूर अग्निशमन केंद्रास कळवली.

आणखी वाचा-जळगाव: अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा तरुणांचा प्रयत्न

घटनास्थळी पोहोचलेल्या अभिजित बनकर यांनी पाण्यात उडी घेऊन जयला बाहेर काढले. त्याच्या शरिरातील पाणी बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याला तोंडाने श्वासोश्वास दिला. पण, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. या बाबतची माहिती सातपूर अग्निशमन दलाचे मुख्य फायरमन राजेंद्र मोरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात पालक घटनास्थळी पोहोचले होते. जयला पाहताच आईने हंबरडा फोडला. सावरगाव शिवारात यापूर्वी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही महाविद्यालयीन युवक व पर्यटक बुडाले आहेत. या भागात पर्यटकांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस व्यवस्था नाही. धरण क्षेत्रात जाण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्यास काही पर्यटकांकडून अरेरावीची भाषा केली जाते.

धोक्यांकडे दुर्लक्ष

उन्हाळी सुट्टीमुळे या भागातून धरणातील पाण्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मित्रांचे गट जिथे भ्रमंतीला जातात, त्याची अनेकदा कुटुंबियांनाही कल्पना नसते. धरणात अनेक उंच-सखल भाग आहे. खड्ड्यांमध्ये पाणी असले तरी ते गाळमिश्रित असू शकते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून अनेक जण पाण्यात उतरतात.

कुठे, कुठे प्रतिबंध करणार?

गंगापूर धरणावर सुरक्षेसाठी काही सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. पण, त्यांची संख्या पुरेशी नाही. बोट क्लबमुळे धरणाच्या एका भागात जाता येते. मात्र तिथे सशुल्क प्रवेश असल्याने अनेक जण इतर मार्गाने धरणाकडे जातात. पाटबंधारे विभागाची धरण परिसरात लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. त्या आधारे विस्तीर्ण क्षेत्रावर नजर ठेवणे शक्य होते. मात्र, वेगवेगळ्या भागातून धरण क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कुठे, कुठे प्रतिबंध करणार, हा त्यांच्या समोरील प्रश्न आहे.

Story img Loader