तृप्ती देसाई, भानुदास मुरकुटे यांना मारहाण; दिवसभर गोंधळ
शनिािशगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आलेल्या भूमाता महिला रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई व त्यांना समर्थन देणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना शनिवारी मारहाण करण्यात आली. पोलिसांचा ढिसाळपणा व गावकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांना चौथऱ्यावरून दर्शन न घेताच परत जावे लागले. त्यामुळे संस्थान परिसरात काही वेळ तणाव, घोषणाबाजी, पळापळही झाली.
शनिवारी महिला चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये म्हणून नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संस्थानचे सुरक्षारक्षक चौथऱ्याभोवती तैनात केले होते. संस्थानचे विश्वस्त व देवस्थान बचाव समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे हे मंदिर परिसरात ठिय्या देऊन होते.
दरम्यान, तृप्ती देसाई या दुपारी तीन वाजता सहकारी महिलांसह आल्या. मुरकुटे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत मुरकुटे यांच्यासह त्या शनिमूर्तीकडे गेल्या. त्यांनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षक व पोलिसांनी चौथऱ्यावर जाऊ दिले नाही. देसाई आल्यानंतर गावकरी व शनिभक्त मोठय़ा संख्येने जमले. या वेळी तृप्ती देसाई व मुरकुटे यांना पुन्हा जमावातील काहींनी मारहाण केली. नंतर पोलीस त्यांना मोटारीत बसवून नगरच्या दिशेने घेऊन गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा