जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला जिल्ह्यात कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी राजकारणात भाजपचे जिल्ह्यात बळकटीकरण केले, या भाष्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. भाजप सोडल्यानंतर तुमचीच परिस्थिती तशी झाली आहे, असे डिवचले.

जिल्ह्यात तापमानाचा पारा ३८ अंशांपुढे चढला आहे. जळगावकरही उन्हामुळे होरपळत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. शरद पवार गटाकडून रावेरसाठी एकनाथ खडसेंचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

हेही वाचा…उत्तर महाराष्ट्रात मविआ उमेदवारांच्या शोधात; सहाही मतदारसंघात अनिश्चितता

दोन दिवसांपूर्वी आमदार खडसे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी राजकारणात भाजपचे जिल्ह्यात बळकटीकरण केले, असे भाष्य केले होते. त्यांच्या भाष्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील महाराज जळकेकर यांनी टीका केली. ज्या भाजपविषयी तुम्ही बोलतात, त्याच भाजपने तुम्हाला बारा खात्याचे मंत्री केले. भाजपने तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद दिले. भाजपने तुमच्या कन्येला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले. भाजपनेच तुमच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद दिले. एवढे असतानाही तुम्ही भाजपला कोणी विचारत नव्हते, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे, असे नमूद केले. खडसे हे बेताल वक्तव्यासाठी जिल्ह्यात नव्हे; तर राज्यात प्रसिद्ध आहेत. यापुढे भाष्य अथवा वक्तव्य करताना वयाचे भान ठेवून करा, असा टोलाही त्यांनी खडसेंना हाणला.

हेही वाचा…नाशिक : प्रौढ साक्षरता परीक्षेपासून स्थलांतरामुळे अनेक जण वंचित

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकरांनी खडसेंवर टीका केल्यानंतर लगेच शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी उडी घेत जिल्हाध्यक्षांवर पलटवार केला. जळकेकर महाराज, तुम्ही कुणाला भाजप शिकविता आहात ? ज्यांनी रक्ताचे पाणी करून पक्षाला वाढविले त्यांना ? चार दिवस झालेत तुम्हाला पक्षात येऊन. अध्यक्षपद दिले आहे म्हणून उगाच काहीही बरळू नका. खडसेंचा विषय रावेर मतदारसंघातील आहे, ते अमोल जावळे त्यांना काय उत्तर द्यायचे ते देतील. आम्हाला माहीत आहे, तुमचा बोलविता धनी वेगळा आहे. जरा त्या धन्याला सांगा, तुमचे जिल्ह्यातील संकटमोचक जाहीरपणे सांगायची हिम्मत करतील का की खडसे यांचे पक्षवाढीसाठी काहीही योगदान नाही. आपले कर्तृत्व, आपली उंची बघून वक्तव्ये करीत चला, असे लाडवंजारी यांनी सुनावले आहे.