लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून करोना महामारीमुळे पवार हे वाढदिवशी शनिवारी मुंबईहून ऑनलाइन सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या सभेत पालकमंत्री छगन भुजबळ हेही मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी ९.३० वाजता औरंगाबाद रस्त्यावरील जयशंकर बँक्वेट सभागृहात शरद पवार यांची सभा दाखवली जाणार आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये उपस्थित राहून ऑनलाइन सभेला संबोधित करणार आहेत. याशिवाय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध भागांत सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सहा विभागांत रक्तदान शिबिराने होणार आहे.

१२ ते १५ डिसेंबर या कालावधीत अंबड येथील ज्युपिटर हॉस्पिटल, दिव्य स्पर्श मल्टी क्लिनिक सातपूर, ग्लोबल हॉस्पिटल त्रिमूर्ती चौक सिडको, वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा, सद्गुरू हॉस्पिटल निमाणी, सतीश शिंदे डेंटल क्लिनिक, आकाशवाणी टॉवर येथे आरोग्य तपासणी शिबीर, ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत पंचवटी येथे क्रिकेट स्पर्धा, १२ ते १४ पर्यंत आकाशवाणी टॉवर येथे व्हॉलीबॉल स्पर्धा, १५ डिसेंबपर्यंत संपूर्ण शहरात नवीन मतदार नोंदणी शिबीर, विद्यार्थ्यांच्या वतीने ११ डिसेंबरला सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मुखपट्टी आणि सॅनिटायझर वाटप, शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, कोविड योद्धा सन्मान, शहरात आरोग्य तपासणी शिबीर, ८१ घडय़ाळ आणि पाच हजार दिनदर्शिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता पंचवटीतील हनुमान वाडीत ज्येष्ठ नागरिकांना मुखपट्टी आणि मफलर वाटप, दुपारी १२ वाजता आधार आश्रमला ५० किलो तांदूळ, गहू, तांदूळ वाटप, बिटको रुग्णालयात ऑॅक्सिमीटर वाटप, कोविड योद्धा सफाई कर्मचारी सत्कार, शनिवारी सायंकाळी सहा वाजताा वृद्धाश्रमात अन्नदान, सामनगाव रोड, सात वाजता जिल्हा रुग्णालयात गरजूंना ब्लँकेट वाटप, रविवारी सिडकोत सकाळी १० वाजता वृद्धांना फळ आणि मुखपट्टी वाटप, ११ वाजता दिलासा वृद्धाश्रमात फळे आणि बिस्किटे वाटप, दुपारी एक वाजता सातपूरच्या कारगील चौकात १०० महिलांना साखर वाटप, विशेष मुलांचे वसतिगृह तवली फाटा येथे भोजन वाटप, १६ डिसेंबर रोजी सिडको येथे ११ वाजता १०० महिलांना साखर वाटप, १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता झाकीर हुसेन रुग्णालयात फळे वाटप, दुपारी एक वाजता बिटको रुग्णालयात फळे वाटप आणि सफाई कामगार सत्कार, १८ डिसेंबर रोजी  १२ वाजता टाकळी गांव येथील गरीब गरजू लोकांना ब्लँकेट वाटप, दुपारी एक वाजता गुरूगोविंद कॉलेजसमोर रक्तदान शिबिर, ऑनलाइन निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, कोविड योद्धाचा सन्मान, दुर्गम भागात कपडे वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.

दोन्ही कार्यक्रमांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader