महाविकास आघाडीचे सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली गेली होती. पहाटेच्या शपथविधीमुळे ही कोंडी फुटली. राष्ट्रपती राजवट फक्त २४ मिनिटांत उठली आणि लख्ख प्रकाश पडला, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिली.
पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या विधानावर नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या खासदार राऊत यांनी मत व्यक्त केले. पहाटेच्या शपथविधीबाबत पवार यांना माहिती होते की नाही हे आपणास माहिती नाही. पण, कोंडी फुटायला शपथविधीने मदत झाली.