नाशिक: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकसाठी नाशिक विभागाला पहिल्यांदाच महिला अधीक्षक लाभल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वी राज्य पोलीस दलातील उपायुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून सुनील कडासने कारभार पाहत होते. त्यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधीक्षक वालावलकर यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, वालावलकर यांची बदली रोखण्यात आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अधीक्षक पदाची खुर्ची रिक्तच होती. मंगळवारी उशीराने वालावलकर यांनी अधीक्षकपदाची सुत्रे हाती घेतली.
लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षकपदाची सूत्रे शर्मिष्ठा वालावलकरांकडे
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारला आहे.
Written by लोकसत्ता टीम
नाशिक
Updated: First published on: 23-11-2022 at 18:53 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmistha valavalkar of the post of anti corruption superintendent ysh