धुळे: मुंबई ते आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील हेंद्रपाडा या भागात शिरपूर तालुका पोलिसांनी बीएस सहा इंजिनच्या मोटारींमध्ये वापरला जाणारा बनावट द्रव युरियाचा कारखाना उदध्वस्त केला. या कारवाईत सुमारे ५३ लाख २५ हजार ९५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
बीएस.सहा इंजिनच्या मोटारी व मालमोटारींमध्ये वापरले जाणारे बनावट द्रव युरिया बनवून ते काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती मुंबई येथील इआयइपी इंडिया कंपनीला मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानुसार अधीक्षक धिवरे यांनी उपअधीक्षक सचिन हिरे, सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांना कारवाईचे निर्देश दिले. यानंतर पथकाने पळासनेर गावाजवळी हेंद्रपाडा येथे बनावट युरिया द्रव बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणाहून मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा… अवकाळीमुळे धुळे जिल्ह्यात २४२ हेक्टर पिकांचे नुकसान; ६२ गावे बाधित
या प्रकरणी जयपाल गिरासे राजपूत (रा.पळासनेर, शिरपूर) चालक छन्ना पावरा (३५.हाडाखेड, शिरपूर), चालक सुरलाल पावरा (२४, नटवाडे, शिरपूर) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.