शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेनेचे नेते यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरत मारण्याची धमकी देणारे माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात ठाकरे गटाने तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सत्तांतरानंतर राणे पुत्राविरोधात तक्रार देण्यास हा गट पुढे आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजीत तांबेंना ‘या’ दोन शिक्षक संघटनांचा पाठिंबा

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले. नीलेश राणे यांनी समाजमाध्यमाद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याबद्दल एकेरी भाषा व शिवराळ शब्दांचा वापर करत मारण्याची धमकी दिल्याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. उध्दव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तर संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत.

हेही वाचा >>> अंत्यसंस्काराला मज्जाव; संशयितांसह तपास अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस, शिंदे गटाचा जिल्हाप्रमुखही सामील

लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवराळ भाषा व मारण्याची धमकी देणे म्हणजे राज्यात अशांतता पसरविण्याचा नीलेश राणे यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असून राज्यात शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. दरम्यान, याआधी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेतला होता. तेव्हा गुन्हा दाखल होऊन नाशिक पोलीस राणे यांच्यावर कारवाईसाठी मार्गस्थ झाले होते. अर्थात तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. राणे पुत्राविरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena hackeray faction demand to arrest nilesh rane using abusive language for party chief zws