नाशिक : महायुतीत तीनही पक्षात तीव्र स्पर्धा, स्थानिक पातळीवर भाजपकडून उमेदवारीस झालेला विरोध आणि नंतर थेट दिल्लीहून छगन भुजबळ यांचे पुढे आलेले नाव अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवली.

लोकसभेची ही गोडसे यांची चौथी निवडणूक आहे. २००९ मध्ये मनसेकडून ते पहिल्यांदा मैदानात उतरले होते. परंतु, तेव्हा ते पराभूत झाले. १९६७ आणि १९७१ या लागोपाठच्या निवडणुकीत बी. आर. कवडे यांच्यानंतर नाशिक लोकसभेच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा केवळ गोडसे हेच विजयी झाले आहेत. एकसंघ शिवसेनेच्या तिकीटावर आजवर ते लोकसभेत पोहोचले होते. यंदा महायुतीत शिवसेनेकडून (शिंदे गट) ते नशीब अजमावत आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका मिळवणारे गोडसे बांधकाम व्यावसायिक आहेत.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा…प्रचारासाठी कमी अवधी उमेदवारी मिळण्यात हेमंत गोडसे यांच्या पथ्यावर

पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून ते राजकारणात सक्रिय झाले. पुढे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना दोन लाखांच्या फरकाने पराभूत करत गोडसे एकदम चर्चेत आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी भुजबळ यांचे पुतणे समीर यांना त्यापेक्षा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. गोडसे यांना यावेळी उमेदवारीसाठी महायुतीतंर्गतच शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. प्रचारासाठी त्यांच्यापुढे केवळ १६ दिवस असल्याने त्यांना आता रात्रंदिवस एक करावा लागणार आहे.