नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारुन चार दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा करत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> “तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले, आता कसं वाटतंय?”; मुंबईत मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी

मागील चार दिवसांपासून सुरु असणाऱ्या या सत्तासंघर्षामध्ये आज भाजपानेही उडी घेत महाविकास आघाडी सरकार अंदाधुंद पद्धतीने शासन आदेश जारी करत असल्याची तक्रार थेट राज्यपालांकडे केलीय. एकीकडे शासकीय स्तरावर कुरघोड्या सुरु असतानाच दुसरीकडे बैठकींचं सत्र सुरु असून कार्यकर्तेही रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. अशाच एका आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शाई आणि अंडी फेकल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: भाजपाने राज्यपालांना पाठवलेलं पत्र जसंच्या तसं – “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राजीनामा देण्याची…”

शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंकडून त्यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेनं शिंदे आणि बंडखोर आमदारांना मुंबई येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलंय. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक असे दोन गट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये अनेकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर करणारे बॅनर्स झळकावले आहेत. तर मुंबईसहीत शिवसेनेची पकड असणाऱ्या अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आपण उभं असल्याचं सांगत शिंदेंविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलनं केली आहेत. नाशिकमधील अशाच एका आंदोलनामध्ये शिंदेसमर्थकांनी लावलेल्या बॅनवर ठाकरे समर्थकांनी शाईफेक केली आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले

नाशिकमधील शिवसेनेच्या समर्थकांनी ‘एकनाथ शिंदे हाय हाय’च्या घोषणाबाजीमध्ये शहरामधील चौकात लावलेल्या एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शाईफेक केलीय. तसेच यावेळेस कार्यकर्त्यांनी या बॅनरवर अंडीही फेकली आहेत. विशेष म्हणजे शाईफेक आणि अंडीफेक करण्यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने समावेश होता.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत.

शिवाय शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली.