नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात उमेदवारांना अंधारात ठेवून सात केंद्रात मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार तथा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. मतदानापूर्वी छाननीत दिलेले मतदान आणि व्हीव्ही पॅट यंत्रांचे क्रमांक आणि १७ सी अर्जातील यंत्रांचे क्रमांक यातून हे उघड होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उमेदवारांना कुठलीही माहिती न देता परस्पर बदल करण्याचा हा प्रकार संशयास्पद असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनाक्रमाची माहिती शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाने पत्रकार परिषदेत दिली. ज्या सात मतदान केद्रांवर मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट परस्पर बदलले गेले, तिथे सुमारे १० हजारच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज आहे. उमेदवारांच्या तक्रारीचे स्पष्टीकरण दिल्याशिवाय मतमोजणी कशी होईल, असा प्रश्न बडगुजर यांनी केला. मतदानाच्या तीन दिवस आधी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्र, व्हीव्ही पॅट यंत्रांची छाननी केली जाते. या प्रक्रियेत संबंधित मतदान केंद्रात वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचे क्रमांक उमेदवारांना दिले जातात. मतदान पार पडल्यानंतर १७ सी अर्ज दिला जातो. छाननीवेळी यंत्रांचे क्रमांक आणि १७ सी अर्जातील यंत्रांंचे क्रमांक वेगवेगळे असल्याचे बडगुजर यांनी नमूद केले. सात मतदान केंद्रात असता प्रकार घडला. काही केंद्रांवर परस्पर केवळ मतदान वा व्हीव्ही पॅट यंत्र बदलले तर, काही ठिकाणी मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट असे सर्व बदलले गेले. यामुळे संशय निर्माण झाला आहे. छाननी प्रक्रिया सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडते. आता काही केंद्रांवर जी यंत्र बदलली गेली, त्यांची या धर्तीवर छाननी झाली नसल्याची साशंकता व्यक्त करण्यात आली.

Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ambadas Danve on ST Bus Ticket Price Hike
Ambadas Danve : एसटीच्या तिकीट दरात वाढ, ठाकरे गट आक्रमक; अंबादास दानवेंनी दिला ‘हा’ मोठा इशारा

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

हे बदल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता का राखली नाही. उमेदवार आणि त्याच्या प्रतिनिधीला यासंदर्भातील माहिती का दिली गेली नाही, असे प्रश्न ठाकरे गटाने केले आहेत. मतदानाच्या दिवशी एका तक्रारीबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही बडगुजर यांनी केला. उमेदवाराची तक्रार ऐकून त्यावर कार्यवाही करणे ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र त्यांनी कुठलीही दखल न घेता पोलिसांकडे दाद मागण्याचा सल्ला दिला, असे बडगुजर यांनी म्हटले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने तक्रार केली आहे. काही मतदान केंद्रांवरील यंत्रात उमेदवारांना कुठलीही माहिती न देता परस्पर बदल करण्यात आल्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

Story img Loader