राजकीय पटलावर वेगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर प्रत्येक राजकीय पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे शनिवारी सातपूर येथील डेमोक्रॅसी सभागृहात आयोजित युवा मेळावा त्याचाच एक भाग आहे.

हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यातील ५१ गावांची आदर्श योजनेसाठी निवड, सर्वसमावेशक विकासाचा प्रयत्न

maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray speech
‘तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’, उद्धव ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावनिक आवाहन
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही
Raj Thackeray refrained from criticizing Aditya Thackeray in the Worli meeting Mumbai
वरळीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा नामोल्लेखही नाही! राज ठाकरे यांनी टीका करणे टाळले

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शहरासह जिल्ह्यात शरद पवार, त्यानंतर छगन भुजबळ, शासन आपल्या दारी उपक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नाशिक दौरे झाले. प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशीही चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून नाशिककडे न फिरकलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आता नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याची पूर्वतयारी आणि नियोजनासाठी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे आदी उपस्थित होते. आगामी महापालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्यादृष्टीने आदित्य ठाकरे यांच्या या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. आदित्य ठाकरे शिवसैनिकांना आणि विशेषतः युवकांना मार्गदर्शन करणार असल्याने सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बागुल,गायकवाड, बडगुजर, गिते यांनी केले.