नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागास सहा नवीन शिवाई बस मिळाल्या आहेत. यातील दोन बस नाशिक-छत्रपती संभाजीनगर आणि दोन नाशिक-सटाणा या नव्या मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत. नाशिक-पुणे आणि नाशिक-बोरिवली मार्गावर शिवाई बस अधिक्याने दृष्टीपथास पडतात. आता नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावरही शिवाई बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावर दोन शिवाई बस सुरू करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर आगाराकडून आणखी दोन बस चालविल्या जातात. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवाशांसाठी आता दिवसभरात चार बस धावतील. या मार्गांवर धावणाऱ्या शिवशाही वातानुकूलित बसच्या तुलनेत शिवाईचा प्रवास खिशावर अधिक भार टाकणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नाशिक : वातावरणातील बदलांमुळे रुग्णसंख्येत वाढ

नाशिक ते सटाणा दरम्यान शिवाई बससेवा सुरू करण्यात आली. या मार्गावर सध्या दोन बस सोडल्या जातील. पूर्वी या मार्गावर चालविण्यात आलेली इ-बस खराब रस्ते व बांधकाम सुरू असल्याने थांबवणे भाग पडले होते. शिवाई बस तुलनेत उंच असल्याने त्यांना कुठलीही अडचण येणार नसल्याचे सांगितले जाते. उर्वरित दोन शिवाई बस नाशिक-बोरिवलीसाठी मार्गावर चालविण्यात येणार आहेत. महामंडळाकडे पाच एलएनजी बस असून त्या जुन्या आहेत. पनवेल भागात त्या वापरल्या जात होत्या. पनवेलपेक्षा एलएनजी नाशिकमध्ये स्वस्त आहे. त्यामुळे त्या नाशिकला हलविण्यात आल्याचे सांगितले जाते. यातील दोन बस धुळे मार्गावर आणि शनी शिंगणापूर, अहिल्यानगर, पाचोरा मार्गावर प्रत्येकी एक बस कार्यान्वित केली जाणार आहे.

हेही वाचा : राहुल कर्डिले नाशिक मनपाचे नवे आयुक्त; डॉ. अशोक करंजकर यांची उचलबांगडी

शिवशाहीच्या तुलनेत अधिक भाडे

शिवाई बसमधून छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाण्यासाठी ४७० रुपये भाडे आकारले जाईल. तर शिवशाही बसमध्ये प्रत्येक प्रवाशाला ४४० रुपये शुल्क आकारले जाईल. नाशिक-सटाणापर्यंतच्या एका बाजूच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला २१० रुपये मोजावे लागतील.