नाशिक: मध्यंतरी काही महिने चाललेले पक्षांतराचे मळभ दूर झाल्यानंतर आता शिवसेनेने (ठाकरे गट) शहरातील नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रत्येक विभागात उप महानगरप्रमुख, उप महानगर संघटक, विभागप्रमुख आणि उप विभागप्रमुख आदी पदांवर अनेकांची नियुक्ती करून सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे नव्या-जुन्या निष्ठावंतांची सांगड घालून ही कार्यकारिणी तयार केल्याचा दावा केला जात आहे.

शिवसेना दुभंगल्यानंतर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व शिवसैनिक दोन गटात विभागले गेले. महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले. नंतर पदाधिकाऱ्यांनी तो मार्ग अनुसरला. मध्यंतरी दोन, तीन महिने पक्षांतराचे वारे वहात होते. ते शांत झाल्यानंतर ठाकरे गटाने पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नव्या-जुन्यांचा मेळ घालत नूतन कार्यकारिणी जाहीर केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शहरात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

हेही वाचा… बनावट कागदपत्रांआधारे गृह कर्ज, राष्ट्रीयकृत बँकेला ८६ लाखांना गंडा

त्यानुसार शहरातील प्रत्येक विभागात चार उपमहानगरप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात उपमहानगर समन्वयक, विधानसभा समन्वयक, विधानसभा संघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा पदांवर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. नव्याने काही पदे तयार करण्यात आली नाही. पूर्वी शिवसेनेत ही पदे अस्तित्वात होती. त्यावर नव्याने नियुक्ती झाल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

हेही वाचा… धुळ्यात समाजवादी पक्षाचे ‘पाणी पाजा’ आंदोलन तर, रस्ते दुरुस्तीसाठी काँग्रेसचा ठिय्या

उदाहरणा दाखल नवीन नाशिक विभागाचा विचार करता उपमहानगर प्रमुखपदी राजेंद्र नानकर, सुनील पाटील, सचिन राणे, नीलेश साळुंखे असे एकूण चार, उपमहानगर संघटक पदावर दादा अहिरे, रमेश उघडे, सतीश खैरनार (तीन), उपमहानगर समन्वयक म्हणून सुयश पाटील, राजू कदम, मयूर परदेशी (तीन), विधानसभा समन्वयक विष्णू पवार, विधानसभा संघटक अशोक पाटील, विभाग प्रमुखपदी बंडू दळवी, बाळा दराडे , अजय काकडे, रवी गामणे, पवन मटाले, संदीप पाटील , प्रदीप पठाडे (सात) विभाग संघटकपदी कैलास चुंबळे, योगेश गांगुर्डे, प्रताप मटाले, किरण शिंदे, दादा मेढे (पाच) विभाग समन्वयक म्हणून दीपक केदार, विक्रम शिरसाट ,संदेश एकमोडे, महेश चव्हाण (चार) आणि उपविभागप्रमुखपदी १३ जणांची नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा… एकनाथ खडसे यांना का हवा खानदेश महाराष्ट्रापासून वेगळा? गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र

सातपूर, मध्य नाशिक, पंचवटी, नाशिकरोड अशा सर्व विभागात कमी-अधिक फरकाने सर्वांवर पदांचा वर्षाव करण्यात आल्याचे दिसून येते. ठाकरे गटाच्या महिला आघाडीत मध्यंतरी फूट पडली होती. नव्या कार्यकारिणीत महिला आघाडीच्या कार्यकारिणीचा समावेश नाही. अनेक जुन्या शिवसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकल्याने नव्या कार्यकारिणीची आवश्यकता मांडली जात होती. त्यात संघटनेत विभागनिहाय उपलब्ध पदांवर अनेकांना स्थान दिले गेले. शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने मुक्तहस्ते पदे बहाल करण्याचे धोरण ठेवले आहे.

नव्या-जुन्या निष्ठावंतांची सांगड घालत शहर कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. प्रत्येक पदाधिकारी सक्षम असून, जनसंपर्क दांडगा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाची बाजी लावून काम करेल. – सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, ठाकरे गट )

Story img Loader