धुळे : पक्षीय गटबाजीच्या राजकारणासाठी आपण अपात्र आहोत. यामुळे अशा गटबाजीला कंटाळूनच राष्ट्रवादीतून स्वखुशीने बाहेर पडलो, असे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष (शरद पवार) अनिल गोटे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेश उपाध्यक्ष व धुळे-नंदुरबार प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने गोटे यांच्याकडे सोपविली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे गोटे यांनी राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोटे यांनी म्हटले आहे, की भाजपमधील गटबाजी, गुंडाना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीस कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देवून बाहेर पडलो होतो. राष्ट्रवादीत स्वेच्छेने प्रवेश घेतला. सलग चार वर्षे शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले अर्थात लोकसंग्रामच्या सर्वच कार्यकत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करण्याचा माझा निर्णय मान्य होता असे नाही. पण केवळ माझ्या प्रेमापोटी सर्वच कार्यकर्त्यांनी आपली नाराजी माझे जवळ स्पष्ट शब्दात बोलून दाखविली. त्याच बरोबर ‘तुम्ही जेथे आम्ही तेथे’ अशी भूमिका स्विकारुन माझ्या समवेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात कार्यरत झाले, असे गोटे यांनी सांगितले. पक्षासाठी केलेल्या कार्यक्रमांचा त्यांनी यावेळी सविस्तर उल्लेख केला.

हेही वाचा >>> धुळ्यात राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा; एका गटाने कार्यालयाला कुलूप लावलं, तर दुसऱ्या गटाने…

दरम्यान, शिंदखेड्याचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या अवास्तव प्रशासकीय हस्तक्षेपाने दोंडाईचा, शिंदखेडा मतदार संघातील जनता त्रस्त झाली होती. असे गोटे यांनी म्हटले आहे. यामुळे आपण ‘दहशतवाद मुक्त शिंदखेडा मतदार संघ’ ही भुमिका गावोगाव मांडल्याची आठवण करून दिली. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग धुळेकर जनतेच्या रस्ता, पाणी, सार्वजनिक स्वच्छता या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी करु, असा निर्णय आपण आता घेतला आहे. यासाठी आपण आपल्या सहका-यांसह राष्ट्रवादीच्या सेवेतून मुक्तता घेत असल्याचे पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वास कळविले आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shock to sharad pawar in dhule state vice president anil gote left ncp party ysh
Show comments