नाशिक – मुंबईनाका परिसरातील व्यापारी संकुलात रात्री तळ मजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यावरील रुग्णालयात दाखल रुग्णांसह डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. खालून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. अग्निशमन दलाने दोन तास शर्थीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मुंबई नाका परिसरातील शताब्दी रुग्णालयाच्या संकुलात तळ मजल्यावर असणाऱ्या इलेक्ट्रिकच्या दुकानात रात्री एक वाजता आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक दोन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. या संकुलात दुसऱ्या मजल्यावर शताब्दी रुग्णालय आहे. आगीवर नियंत्रण न मिळवल्यास त्याची झळ रुग्णालयास बसण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी बंद दुकानाचे टाळे तोडून दोन्ही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशमन अधिकारी के. टी. पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टर, रुग्णांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत धीर दिला. आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली. धूर कोंडू नये म्हणून रुग्णालयाची सर्व तावदाने खुली करण्यात आली.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान

हेही वाचा – नाशिक: ब्रेक नादुरुस्तीमुळे शिवशाहीची वाहनांना धडक, महिला गंभीर

हेही वाचा – नाशिक: पेट्रोल फुगे फेकून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

आग लागलेले दुकान तळ मजल्यावर असल्याने रुग्णालयास धोका नव्हता. रुग्णांना हलविण्याची गरज पडली नाही, असे पाटील यांनी सांगितले. ज्या दुकानात आग लागली होती. तिथे पोटमाळा आहे. तेथे पसरलेली आग विझविण्यास वेळ लागला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत दुकानातील फॅन व इलेक्ट्रिक उपकरणे भस्मसात झाले होते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे पथक प्रमुख के. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतोष आगलावे, सोमनाथ थोरात, उदय शिर्के, विजय शिंदे, वाहन चालक गणेश गायधनी, शरद देटके आदींनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.