नाशिक – दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे फर्निचर आणि किराणा दुकानाला सोमवारी दुपारी आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी दिंडोरी आणि पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन विभागाकडून सायंकाळी उशीरापर्यंत प्रयत्न सुरु होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लखमापूर परिसरातील मुख्य रस्त्यावर जगदंबा फर्निचर आणि किराणा दुकान आहे. या दुकानाला सोमवारी दुपारी आग लागली. दुकानात फर्निचर आणि धान्य असल्याने आग जोराने पसरली. आगीसंदर्भात दिंडोरी आणि पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन केंद्रास कळविण्यात आल्यावर दोन्ही ठिकाणचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात येत होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. फर्निचर दुकानातील संपूर्ण साहित्य आणि दुकानातील किराणा मालासह धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.