लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या ७४८ मिलिमीटर म्हणजेच ९८.१ टक्के पाऊस झाला आहे. १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद असताना घाटमाध्यावरील मुसळधार पावसाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत मात्र हे प्रमाण १०७८ मिलिमीटरने घटले आहे. पेठ आणि नाशिकमध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
indusInd bank shares crash over 19 percent
इंडसइंड बँकेच्या समभागात १९ टक्क्यांची घसरण; देशातील अव्वल दहा बँकांमधूनही गच्छंती
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?
pune citizens are in trouble due to bad weather Care advice from healthcare professionals
खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला

यंदाच्या हंगामात प्रारंभीचे एक ते दीड महिना अनेक भागात पावसाची प्रतिक्षा करावी लागली होती. या काळात घाटमाध्यावर अधूनमधून पाऊस कोसळला. परंतु, इतर भाग कोरडे राहिल्याने ऐन पावसाळ्यात शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आली होती. ऑगस्ट महिन्यात चित्र पूर्णपणे बदलले. मुसळधार पावसाने कधी आठवडाभर तर, कधी सलग पाच दिवस हजेरी लावली. यामुळे कोरडीठाक पडलेली वा पडण्याच्या स्थितीत असणारी धरणे तुडुंब भरली. सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. प्रशासनाच्या माहितीनुसार एक जून ते दोन सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७६२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा त्यात काहिशी घट झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८.१ टक्के पाऊस झाला असून लवकरच तो सरासरी गाठण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

समीकरणांमध्ये बदल

यंदा पावसाची आजवरची समीकरणे पूर्णतछ बदलल्याचे दिसून येते. घाटमाध्यावरील भागात दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. आजही या भागात ती स्थिती असली तरी इगतपुरीत हे प्रमाण मात्र लक्षणीय कमी झाले. या तालुक्यात सरासरी २६६३ मिलिमीटर पाऊस पडतो, यंदा केवळ १५८५ मिलिमीटर (५९ टक्के) पावसाची नोंद झाली. म्हणजे सरासरीच्या तुलनेत जवळपास १०७८ मिलिमीटर कमी पाऊस झाला. पेठ तालुक्यात सरासरीच्या तुलनेत २०० मिलिमीटर कमी म्हणजे १५०७ मिलिमीटर (८७ टक्के) पाऊस झाला. नाशिक तालुक्यात ५४९ मिलिमीटर (९८.६ टक्के) पाऊस झाला. नाशिक आणि पेठ या तालुक्यांचा विचार करता इगतपुरीत पावसाचे प्रमाण सर्वाधिक घटल्याचे दिसून येते.

आणखी वाचा-भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा

१२ तालुक्यांत सरासरी पार

हंगामात तीन तालुके वगळता इतर १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुष्काळी व कमी पावसाच्या भागात त्याने जोरदार हजेरी लावल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. मालेगाव तालुक्यात आतापर्यंत ४७७ मिलिमीटर (१३७.९ टक्के), बागलाण ५७८ (१६२), कळवण ६४७ (१३०.७), नांदगाव ५१७ (१४३.८), सुरगाणा १५०७ (१०९.९), दिंडोरी ८९१ मिलिमीटर (१६४.८), निफाड ४२४ (१२८.३), सिन्नर ४७० (१२४.२), येवला ४३३ (१३१), चांदवड ६२१ (१५३.८), त्र्यंबकेश्वर १९४५ मिलिमीटर (१०२) आणि देवळा तालुक्यात ५४५.२ (१७७.५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.