राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २०१६ या वर्षासाठी देण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला आहे. जळगाव येथे उद्या, शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य सरकारतर्फे दरवर्षी शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मान चिन्ह असे आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, पंडित जसराज, ज्येष्ठ सतारवादक पंडित रामनारायण आदींना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. जळगाव येथील बाल गंधर्व नाट्यगृहात संध्याकाळी साडेसहाला हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पंडित भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या शास्त्रीय संगीत महोत्सवात १७ मार्च रोजी गायिका प्रीती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी सहभागी होणार आहेत. १८ मार्च रोजी गायक देबबर्णा कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोद वादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना यांच्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे. १९ मार्च रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरी वादक विवेक सोनार आपली कला सादर करतील. वसंत चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव या संस्थेच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.