नाशिक – त्र्यंबकेश्वर मंदिर कथित प्रवेश प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी एसआयटीचे पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी विश्रामगृहात दोन्ही गटातील लोकांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संदल मिरवणुकीच्या वेळी एका गटाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते.
यावरुन वाद निर्माण होऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिर शुध्दीकरणाचा विधी करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणाची एसआयटीतर्फे चौकशी करण्याचे जाहीर केले होते. शुक्रवारी एसआयटी पथकाने हिंदू, मुस्लिम समाजबांधवाची वेगवेगळी बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन परंपरा, पूजा पध्दती याविषयी माहिती घेतली.