नंदुरबार – शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्याने मोठे नुकसान झाले असून तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ मंगळवारी रात्री किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अश्रुधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी अर्ध्यातासात परिस्थिती नियंत्रणात आणली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा