केंद्र शासनाकडून शहरात २४ हजार स्क्वेअर मीटर जागेवर अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीसाठी सहा कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी तीन टप्प्यांत मिळणार असून यात ७५ लाख रुपये हे महानगरपालिका, तर सहा कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्राच्या शहरी क्रीडा संकुल योजनेचा नाशिकला फायदा होण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा सुरू केला. महानगरपालिकेस त्यांनी  तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. दसक येथील आढावनगरमधील आरक्षित जागेचा प्रस्तावात विचार करण्यासाठी नगरसेवक शैलेश ढगे यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. त्यानंतर सदर प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत महाराष्ट्र सासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास अखेर मंजुरी मिळाली आहे. या संकुलासाठी केंद्राकडून तीन टप्प्यांत निधी मिळणार असून ६९ लाख ५० हजार रुपयांचा निधी केंद्राने वितरितही केला आहे. या संकुलात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळाही राहणार असून सिंथेटिक कोर्टही राहणार आहे. याव्यतिरिक्त स्केटिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, व्हॉलीबॉल, टेनिस आदी खेळांसाठी कोर्टची व्यवस्था राहील.

संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांचे वेतन महापालिका करणार आहे. या संकुलात येणाऱ्या खेळाडूंकडून कमीतकमी शुल्क आकारले जाणार असून या शुल्कातून संकुलाची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल. आजपर्यंत केंद्र सरकारकडून हव्या त्या प्रमाणात नाशिकला योजनांचा लाभ मिळत नव्हता हे निदर्शनास आणून देत खा. गोडसे यांनी या क्रीडा संकुलामुळे शहरातून अधिकाधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तर गाठणारे खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आयुक्त गेडाम, नगरसेवक ढगे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचेही संकुल मंजुरीसाठी सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.