येवला तालुक्यातील एरंडगाव येथे पिसाळलेल्या श्वानाच्या चाव्याने पाच ते सहा जण जखमी झाले असून या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा- पूर पातळी चिन्हांकनावरून महानगरपालिका-जलसंपदात आटय़ापाटय़ा
शनिवारी सायंकाळच्या सुमारास एरंडगावात अचानक कुठूनतरी एक पिसाळलेला श्वान आला. समोर दिसेल त्याला चावण्यास त्याने सुरुवात केल्याने एकच घबराट पसरली. श्वानाने एका वृद्ध महिलेला तसेच चार ते पाच बालकांना चावा घेतला. जखमी झालेल्या सर्वांना येवला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे. हा श्वान पिसाळलेला असल्याने तो अजूनही इतरांसाठी धोकादायक झाला आहे. या श्वानापासून सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.