जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव आणि चोपडा येथे गावठी १३ बंदुकांसह जिवंत काडतुसे बाळगणार्‍या सहा जणांना वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांत अटक करण्यात यश आले आहे.चाळीसगावातील कारवाईत गावठी चार बंदुका, १० जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केली, तर चोपड्यातील कारवाईत गावठी नऊ बंदुका, २० जिवंत काडतुसांसह चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पेालीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांनी दिली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसह मंत्र्यांचेही दौरे वाढले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, अवैध धंद्यांवर त्यांनी नजर ठेवली आहे. जिल्ह्याच्या लगतच्या राज्य सीमांवरही पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशच्या सीमेवर चोपडा तालुका आहे. मध्य प्रदेश सीमेवरील उमर्टी येथून अवैधरीत्या गावठी बंदुकांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. त्याअनुषंगाने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर, हवालदार शशिकांत पारधी, किरण पाटील, गजानन पाटील, संदीप निळे, गृहरक्षक दलातील छावर्‍या बारेला, सुनील धनगर, श्रावण तेली, संदीप सोनवणे यांच्या पथकाने कृष्णापूर ते उमर्टीदरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर संशयित हरजनसिंग चावला (२०), मनमितसिंग बर्नाला (२०, दोन्ही रा. पारउमर्टी, मध्य प्रदेश), अलबास पिंजारी (२७, रा. महादेव चौक बाजारपेठ, हरिविठ्ठलनगर, जळगाव), अर्जुन मलिक (२५, रा. एकतानगर, अमृतसर, पंजाब) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी नऊ बंदुका, २० जिवंत काडतुस, चार भ्रमणध्वनी संच, दोन दुचाकी, असा सुमारे चार लाख सात हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पथकाने चौघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या गोणीत मुद्देमाल मिळून आला. गोणी ताब्यात घेत असताना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यासाठी हुज्जत घालून पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला. संशयित अलबास पिंजारी हा गुन्हे नोंदवहीतील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>नंदुरबारमध्ये आदिवासींना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसची खेळी, राहुल गांधी यांच्या यात्रेचे ‘आदिवासी न्याय यात्रा’ नामकरण

चाळीसगाव शहरात पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सागर ढिकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, हवालदार राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, ज्ञानेश्‍वर गिते, ज्ञानेश्‍वर पाटोळे, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील यांच्या पथकाने धुळे रोडवर नाकाबंदी केली होती. नाकाबंदीत दुचाकीवरून  येणाऱ्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांचा पाठलाग केला. यातील अमीर खान (२०, रा. काकडे वस्ती, पुणे) याला अटक केली, तर दुसरा त्याचा साथीदार आदित्य भुईनल्लू (रा. पुणे) फरार झाला. अटकेतील संशयितांकडून गावठी चार बंदुका, १० जिवंत काडतुसांसह एक दुचाकी, असा दोन लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आमीर आसिर हा पुणे येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे नोंदवहीतील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याला पुण्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याचे उघड झाले आहे, असेही पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.