लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या विशेष पथकावर सहा संशयितांकडून हल्ला करण्यात आला.

ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला एका व्यक्तीच्या घरी देशी-विदेशी दारूचे खोके असल्याची माहिती मिळाली. पथकाने जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली. याचा राग आल्यामुळे संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी एकत्र येत विशेष पोलीस पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ तसेच मारझोड केली.

हेही वाचा… जळगावातील स्टेट बँक शाखेत भरदिवसा दरोडा; १५ लाखांची रोकड लंपास

पथकातील महिला पोलिसालाही धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. पथकातील पोलिसांनी त्याला प्रतिकार केला. परंतु, पथकातील सदस्य संख्या कमी असल्याने.पथकाला मारहाण करण्यात आली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात महिला पोलीस ललिता सुरडकर यांच्या तक्रारीवरून सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी घटनास्थळी भेट दिली.