सद्य:स्थितीत ७ हजार रुग्णांवर उपचार
नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ४० हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून आतापर्यंत ३१ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात सात हजार १११ रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज जितके नवे रुग्ण आढळतात, जवळपास तितके च किं वा त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.
करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका, आरोग्य, जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असूनही बाधितांची संख्या वाढतच आहे. गणेश विसर्जनावेळी झालेली गर्दी, नियमांकडे डोळेझाक ही बाबही प्रादुर्भाव वाढविण्यास हातभार लावणारी आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार करोनाचे आतापर्यंत सर्वाधिक २६ हजार ६७१ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात आढळले. मालेगाव महापालिका क्षेत्रात २६६५, ग्रामीण भागात ९५८१, तर जिल्हाबाह्य़ रुग्णांची संख्या २२९ इतकी आहे. यातील ३१ हजार १४१ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. जिल्ह्य़ाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.५५ टक्के आहे. जलद प्रतिजन चाचण्यांद्वारे रुग्ण शोधण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्य़ात ९७२ रुग्ण आढळले. त्यापेक्षा अधिक म्हणजे ९८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. करोनामुळे आतापर्यंत नाशिक शहरात ५०६, नाशिक ग्रामीणमधील २५१, मालेगाव महापालिका क्षेत्रात ११३ आणि जिल्ह्य़ाबाहेरील २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सद्य:स्थितीत सात हजार ७१११ रुग्ण उपचार घेत आहेत. यात ग्रामीण भागातील २२९३ जणांचा समावेश आहे.
नाशिक तालुक्यात ३८०, चांदवड ५०, सिन्नर ३९८, दिंडोरी ६०, निफाड ४१२, देवळा ६८, नांदगांव २६१, येवला ६३, त्र्यंबकेश्वर ३४, सुरगाणा सहा, पेठ सहा, कळवण १०, बागलाण १९०, इगतपुरी ६५, मालेगांव ग्रामीण २९० रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार १९८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०५ तर जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्य़ात एक लाख ३३ हजार ९२५ जणांचे नमुने तपासण्यात आले.
त्यातील २९.२३ टक्के नमुने सकारात्मक आले तर ९३ हजार ३९२ म्हणजे ६९.७३ टक्के जणांचे नमुने नकारात्मक आले. १३८७ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.३१ हजार रुग्ण करोनामुक्त सद्य:स्थितीत ७ हजार रुग्णांवर उपचार