लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: शासनाने विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला असून, या उपक्रमांतर्गत समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन जात प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. येथील मूळजी जेठा महाविद्यालयात समाजकल्याण विभागातर्फे नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेण्यात आली.

डॉ. नारनवरे यांनी समाजकल्याण विभागात आजपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांना चांगले यश प्राप्त झाले असून, लाखो लोकांना योजनांचा लाभ देण्यात विभाग यशस्वी झाला असल्याचे सांगितले. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच केंद्र सरकार मॅट्रिकोत्तर आणि मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी विशेष शिबिरे घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा… धुळे: प्रार्थनास्थळाची विटंबना करणाऱ्या पाच जणांना अटक

बैठकीत नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी नाशिक विभागाचा, तर सहायक आयुक्त वाय. एस. पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध योजनांचा आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला. बैठकीला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गुलाबराव खरात, उपायुक्त राकेश महाजन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी भाऊ खरे, अहमदनगर येथील सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, नाशिक येथील सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, नंदुरबार येथील सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रामसिंग, नाशिकचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, धुळ्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनीष पवार, समाजकल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social welfare commissioner dr prashant narnaware directed to carry out a campaign to give caste certificate in colleges dvr
Show comments