नाशिक – विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात थेट व्यासपीठावर हजेरी लावत आपण वेगळ्या वाटेवर निघाल्याचे अधोरेखीत केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत जे दडून मदत करीत होते, ते आता सोबत येत असल्याचे सूचक विधान केले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पंचवटीतील जयशंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये पार पडला. मेळाव्यानंतर जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पाटील यांनी संवाद साधला. या मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली. त्यांना व्यासपीठावर जागा दिली गेली. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी गोकुळ हे इच्छुक होते. आता दिंडोरी विधानसभेतून ते इच्छुक असून त्यांनी वडील नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार गटाकडे यावे, अशी अपेक्षा प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली. कुटुंब व्यवस्था वेगळी आणि राजकारण वेगळे. वडिलांची निष्ठा अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर आहे. लोकसभेला कार्यकर्त्यांची इच्छा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याबरोबर राहण्याची होती, असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
sharad pawar elected guest president for 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan
शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण

हेही वाचा >>> नाशिक-मुंबई महामार्ग ३१ जुलैपर्यंत सुस्थितीत; ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आश्वासन

विधानसभा उपसभापतींचा मुलगा मेळाव्यात सहभागी झाल्याच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना चिमटे काढले. गोकुळ आले किंवा दिसले नाहीत तर चर्चा होते. महागाई, बेकारी काही दिसली नाही. आमचे सरकार आले असते तर जीएसटी कमी करणार होतो. लोकसभेला विधानसभेपेक्षा चांगले चित्र राहील. तेव्हा जे दडून मदत करीत होते, ते सोबत येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

प्रदेशाध्यक्षांकडून कानपिचक्या अतीआत्मविश्वास बाळगू नका, विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. लाट आहे म्हणून आपण निवडून येऊ, हा भ्रम ठेऊ नका, अशा कानपिचक्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. महाविकास आघाडी एकसंघ ठेवायची असून परस्पर कुठलीही विधाने होणार नाहीत याची दक्षता बाळगा. महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करा. स्वतंत्र दौरे सुरू करा, असेही त्यांनी सूचित केले. केंद्रात भाजपचे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीच्या खासदारांना दिल्लीत पाठवले. विधानसभेचे वारे फिरू लागल्याने समोरील लोक घाबरले आहेत. महायुतीला तिजोरीत किती पैसे आहेत, हे कळत नाही. त्यामुळे काहीही योजना ते जाहीर करीत असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातून काय हिरावून नेले, याची मोठी यादी लवकरच जाहीर केली जाईल. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या अभियानातून सूचना करा. सामान्य नागरिकांनाही त्यात सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. गुजरातचे नेते येतात आणि पवार साहेबांवर आक्षेप घेतात. निवडणुकीत भाजपकडे पाण्यासारखा पैसा कुठून आला, हा आपला प्रश्न असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

Story img Loader