जागतिक जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताहांतर्गत नाशिक जिल्हा हास्य योग समन्वय समिती, नाशिक वकील संघ व विभागीय माहिती कार्यालय यांच्यातर्फे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती उपसंचालक सतीश लळीत, वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे उपस्थित राहतील. नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समितीच्या वतीने डॉ. सुषमा दुगड, आदिती वाघमारे व अ‍ॅड. वसंतराव पेखळे यांचे ‘हास्ययोगातून जलसंवर्धन’ या विषयावर व्याख्यान होईल. तसेच या वेळी ‘पाण्याशी मैत्री, जीवनाची खात्री’ हे पथनाटय़ सादर करण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनात छोटय़ा छोटय़ा सवयींचा अवलंब केल्यास होणाऱ्या पाणी बचतीकडे लक्ष वेधण्यात येणार असून पाणी बचतीविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

Story img Loader