नाशिक – आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्यातील २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यासह पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत विशेष प्रशिक्षण दिले. हे अधिकारी नंतर आपल्या कार्यक्षेत्रात शिबीर आयोजित करून इतरांना प्रशिक्षित करतील.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम, तामिळनाडूचे मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू आणि पश्चिम बंगालचे आरिझ आफताब यांनी विविध विषयांवर पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. उपनिरीक्षक ते उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी या विशेष प्रशिक्षणात सहभागी झाले होते. विधानसभा निवडणूक मुक्त व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पोलिसांना निवडणूक प्रक्रिया, आयोजन, त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत नियम व कायद्यांची जाण असणे आवश्यक आहे. यासाठी या विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. निवडणूक काळात पोलीस अधिकाऱ्यांवर विविध प्रकारची जबाबदारी असते. संवेदनशील मतदान केंद्र शोधणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणुकीपूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई, निवडणुकीवर पैसा व दबावतंत्राचा प्रभाव पडणार नाही, याची दक्षता घेणे आदी कामे करावी लागतात. दलात नवीन नियुक्ती अथवा आणि ज्यांना बढती मिळाली, त्याना निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून नवीन जबाबदारी आहे, अशा सर्वांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
ajit pawar jayant patil
Ajit Pawar: “ऊस उत्पादकांना पैसे देऊ न शकणाऱ्यांना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न”, अजित पवारांची जयंत पाटलांवर बोचरी टीका