जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गोराडखेडा गावानजीक भरधाव मोटारीने चौघांना मागून जोरदार धडक देत चिरडले. यात विद्यार्थिनीसह वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मोटार पेटवून देत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन करुन संशयितांना ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी पाचही संशयितांना अटक केली आहे.
दुर्वा पवार (१५), सुभाष पाटील (६०) अशी मृतांची नावे आहेत. पाचोर्याहून जळगावकडे भरधाव मोटारीतून पाच जण प्रवास करत होते. गोराडखेडा गावानजीक पादचारी सुभाष पाटील, दुचाकीस्वार परशुराम पाटील (५१) यांच्यासह पी. के. शिंदे शाळेतून सायकलीने घरी जात असलेली नववीतील दुर्वा पवार, ऋतुजा भोईटे (१५) यांना मोटारीने मागून जोरदार धडक दिली. त्यात सुभाष पाटील यांचा जागीच, तर दुर्वा पवार हिचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जखमी परशुराम पाटील यांना जळगाव येथे, तर ऋतुजा भोईटे हिला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना इतकी थरारक होती की, मोटारीने दोन शालेय विद्यार्थिनी, पादचारी आणि दुचाकीस्वारास सुमारे ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. दुचाकी अडकल्याने मोटार गावानजीक थांबली. घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थांनी धाव घेतली. मोटारीत अडकलेले जखमी परशुराम पाटील यांना बाहेर काढण्यासाठी मोटारच उलटी करावी लागली. संतप्त ग्रामस्थांनी मोटार पेटवून दिली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
हेही वाचा : आधी खांबाला, नंतर झाडाला जोरदार धडक; नाशिक जिल्ह्यातील बस अपघातात १७ जखमी
पाचोरा पोलिसांनी मोटारचालक मुजाहीद शेख (२३), विवेक मराठे (२४), रौनक गुप्ता (२५), दुर्गेश पाथरवट (२०, सर्व रा. बळीरामपेठ, जळगाव) आणि राजेश बांदल (३२, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना ताब्यात घेतले. सर्वजण मद्यप्राशन केलेले आढळून आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रात्री उशिरा ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांना ताब्यात घेण्यासाठी राडा घातला.