नंदुरबार – उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडण्याची भूमिका घेतल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. पक्ष ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. पक्ष हा कार्यकर्ते, खासदार, आमदारांना घेवून बरोबर जात असतो. पक्षात फक्त एकाने काही ठरवले आणि निर्णय घेतला, असे काही होत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील श्री श्रीनारायणपुरम येथे धार्मिक विधीसाठी आलेल्या खासदार शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर काही लोक अस्वस्थ झाले आहेत. काही लोकांना वेड लागले आहे. पक्षाची घटना अवैध पध्दतीने बदलूनही ती निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली नाही, हे निकालात विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे खासदार श्रीकांत शिंदे आले असता त्यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

मुख्यमंत्री शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे प्रेरीत होवून अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत. हे ठाकरे गटाचे अपयश आहे. पुढील काळात शिवसेनेत अधिक जण प्रवेश करतील. संजय राऊत यांना जास्त गंभीरपणे घेवू नका, आम्हीही त्यांना गंभीरपणे घेत नाही, असा सल्लाही खासदार शिंदे यांनी पत्रकारांना दिला.