मनमाड: मनमाड शहरातील दत्त मंदिर रस्त्यावरील एका ठिकाणाहून शहर पोलिसांनी २३ अवैध तलवारी तसेच एका तरुणाच्या ताब्यातून एक असा २४ तलवारींचा शस्त्रसाठा तसेच एक मोटरसायकल असा एकूण ९० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संदीप पवार (रा.वडगांव पंगू, ता.चांदवड) तसेच चरणसिंग भूपिंदरसिंग (२७, रा.अमृतसर) या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मनमाड शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते, गणेश नरोटे, गौरव गांगुर्डे, राजेंद्र खैरनार, रणजित चव्हाण, चांदवडचे हवालदार पालवी, उत्तम गोसावी यांनी केली आहे.

Story img Loader