नाशिक शहर परिसरात एकिकडे गुन्हेगारीचा आलेख वाढत असताना चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून मुद्देमालही जप्त करण्यात येत आहे. पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नाशिक शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत चोरांकडून जप्त केलेले दागिने, दुचाकी, चारचाकी, भ्रमणध्वनीसह असा एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल सोमवारी तक्रारदारांना परत करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक: स्वयंपाक करत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट; महिलेसह तीन मुलं जखमी

दिवसाढवळ्या कोयते, तलवारी हातात घेऊन होणारी लुटमार, वाहनांची तोडफोड, अशा घटना वाढत असल्यानेे पोलिसांविषयी एकीकडे नााशिककरांमध्ये कमालीची नाराजीची भावना निर्माण होत असताना दुसरीकडे पोलीस त्यांच्याकडून शक्त होईल, त्याप्रमाणे गुन्हे रोखण्याचे काम करीत आहेत. वर्षभरात दाखल मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांचे तसेच गुन्हे शाखा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अनेक गुन्हे उघडकीस आणत चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला. त्यात ३८ लाख, ९० हजार ४२४ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २५ लाख, ७० हजार रुपयांच्या दुचाकी, ५२ लाख, ४० हजार रुपयांच्या चारचाकी, तीन लाख, २० हजार २६९ रुपयांचे भ्रमणध्वनी आणि १५ लाख, ८६ हजार ७७० रुपयांचा इतर माल याप्रमाणे एक कोटी, ३६ लाख, सात हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा- जळगाव: गोद्रीतील महाकुंभ म्हणजे बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार – बाबूसिंग महाराज यांचे प्रतिपादन

न्यायालयात हा मुद्देमाल सादर केला असता न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी समारंभपूर्वक पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते तक्रारदारांना पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात मुद्देमाल परत करण्यात आला. चोरीस गेलेला माल परत मिळाल्यामुळे तक्रारदार भारावून गेले होते. यावेळी महेश रुईक, विजय लाहोटी, नरेंद्र पवार, अश्विनी मोरे, सुनिता तिदमे, सुनील कर्डक आदींनी आपल्या भावना व्यक्त केला.

हेही वाचा- धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा

आतापर्यंत सात कोटीहून अधिकचा मुद्देमाल परत

याआधी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील जप्त मुद्देमालाचे सात वेळा वाटप करण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत सात कोटी, ७७ लाख, ९३ हजार,९६३ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen goods returned to complainant by police in nashik dpj