लोकसत्ता वार्ताहर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धुळे: पोलीस गाडीवर दगडफेक करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपाखाली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शंभरफुटी रोडवरील अलहेरा शाळेजवळ हा प्रकार घडला. दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
चाळीसगावरोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इंद्रजीत वैराट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील शंभर फुटी रोडवरील अलहेरा शाळेजवळ वैराट हे शासकीय काम करत असताना पापा काल्या उर्फ वसीम शेख (रा. दोन हजार वस्ती,धुळे),अली उर्फ शरीफ खान (रा. कबीरगंज रहमत मशीदजवळ, धुळे) आणि कादिर शेख (रा.अलहेरा हायस्कूलजवळ, धुळे) हे तिघेजण त्या ठिकाणी आले. शासकीय काम करू नये म्हणून दहशत निर्माण करत पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यामुळे वाहनाची काच फुटून नुकसान झाले.
आणखी वाचा-राज्यपाल दौऱ्यानंतरच रस्ता काँक्रिटीकरण, गोवर्धन ते मुक्त विद्यापीठ रस्त्याचे सद्यस्थितीत सपाटीकरण
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शरीफ खान आणि वसीम शेख यांना अटक करण्यात आली असून कादिर शेख हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.