धुळे : शहरातील ४० टक्के पथदिवे बंद असून नवरात्री उत्सवापूर्वी विविध भागात पथदिवे लावावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले आहे. शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचा ठेका १५ ते १७ कोटीत देण्यात आला. या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती. असे असताना शहरातील ४० टक्के पथदिवे आजही बंद स्थितीत आहेत. सत्ताधारी भाजप आणि ठेकेदारामध्ये टक्केवारीचे संबंध आहेत का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

नवरात्री उत्सवात महिला रात्री, पहाटे मंदिरात दर्शनासाठी जातात. ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम असतात. अशावेळी रात्रीच्या अंधारामुळे छेड काढण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे शहराचे चार भागात विभाजन करून प्रत्येकी दहा कर्मचार्यांचे स्वतंत्र पथक तयार करावेत. शहरातील प्रत्येक भागात तसेच प्रत्येक खांबांवर पथदिवे लावण्यात यावे. मनपाने केलेला सर्व खर्च हा संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा, अशा मागण्या विधानसभा संघटक ललित माळी,  जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील आदींनी केल्या आहेत.

liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Bangladeshi infiltrators Dhule, Four Bangladeshi infiltrators arrested, Bangladeshi infiltrators,
धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
nashik Malegaon liquor marathi news
मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त
Pre season grapes fetching prices ranging from Rs 140 to Rs 200 per kg due to reduction in production due to unseasonal rains
उत्पादन घटल्याने अर्ली द्राक्षांना अधिक दर, निर्यातीतील अडथळे कायम
Dada Bhuse claimed surprise visits by officials to rural schools will improve educational standards
शाळांना शिक्षण मंत्री, सचिवांच्या लवकरच अचानक भेटी दादा भुसे यांचे प्रतिपादन
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
nashik manikrao shinde critisized Chhagan Bhujbal on staying out of cabinet
मंत्रीपद न मिळणे हा नियतीकडून अपमान, माणिकराव शिंदे यांचा भुजबळ यांना चिमटा
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
Story img Loader