धुळे : शहरातील ४० टक्के पथदिवे बंद असून नवरात्री उत्सवापूर्वी विविध भागात पथदिवे लावावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले आहे. शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचा ठेका १५ ते १७ कोटीत देण्यात आला. या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती. असे असताना शहरातील ४० टक्के पथदिवे आजही बंद स्थितीत आहेत. सत्ताधारी भाजप आणि ठेकेदारामध्ये टक्केवारीचे संबंध आहेत का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in