लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून, महसूल विभागाच्या पथकांवर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळूमाफियांवर लगाम लागेल. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वाळूघाटासंदर्भातही निर्णय घेण्यात येणार आहे, असे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारीपदाची सोमवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यात नदीपात्रांतून अवैध वाळू उत्खनन, उपसा, साठवणूक आणि वाहतुकीचा प्रश्न सर्वांत मोठा आहे. आता वाळूमाफियांवर लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या पथकांवर हल्ला करणार्या वाळूमाफियांवर आता महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यासह हद्दपारीसारखे गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच वाळू वाहतुकीची साधने, डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी, बोट यांसह इतर साहित्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही प्रसाद यांनी दिला.
जळगाव जिल्ह्याचा विकासाचा दर वाढविण्यासाठी काम करणार आहे. आता होऊ घातलेल्या निवडणुकांवर अगोदर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्याकडे प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. शेतीची उत्पादकता वाढविणे, रोजगार निर्माण करणे, उद्योगधंद्यांना चालना देणे यांसह महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य राहणार आहे. शिक्षण, आरोग्याच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारण घडवून आणण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
हेही वाचा… Video : नाशिकमध्ये समाजकंटकांचा धुमाकूळ; अनेक वाहनांची जाळपोळ, तोडफोड
जिल्ह्यातील गावागावांमध्ये एक गाव, एक गणपती आणि शहरांमध्ये एक वॉर्ड, एक गणपती असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात सर्व जळगावकरांनी सहभागी होऊन गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात, सामाजिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा नऊ ते ३० ऑगस्टदरम्यान होणार आहे. याअंतर्गत माझी माती, माझा देश ही प्रस्तावित मोहीम स्वातंत्र्यलढ्यासाठी ज्या वीरांनी त्याग गेला, त्यांच्या आदर-सन्मानासाठी राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा… मारहाणीमुळे जखमी महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; धुळ्यातील ड्रीम्स हर्बल कंपनीच्या मालकास अटक
युवापिढीमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, हे मोहीम राबविण्यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून माती गोळा करून तालुक्याच्या ठिकाणी एकत्रित करून, तालुक्यातून कलश दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. असे देशभरातून साडेसात हजार कलश एकत्रित करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकार्यांमार्फत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. माझा माती- माझा देश भारताच्या मातीचा आणि शौर्याचा एकत्रित उत्सव स्वातंत्र्य व प्रगतीच्या राष्ट्राच्या प्रवासाचे स्मरण करते. हा कार्यक्रम भूमीशी संबंध जोडून आणि आपल्या वीरांचा सन्मान करून, राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण करेल व भावी पिढ्यांना भारताच्या लाडक्या वारसाचे रक्षण करेल, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.