शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. गौरव बोरसे (२१) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- सहा महिन्यांच्या बालकांनाही लस?; गोवर नियंत्रणासाठी वयोमर्यादा घटवण्याबाबत केंद्राकडून लवकरच निर्णय
के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात गौरव राहत होता. वाणिज्य तृतीय वर्ष शाखेचा तो विद्यार्थी होता. मंगळवारी सकाळी त्याच्या शेजारच्या खोलीतील मित्र इस्त्री मागण्यासाठी गौरवच्या खोलीकडे गेला असता आत्महत्येचा प्रकार उघड झाला. गौरवच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचे पालक सटाणा येथील रहिवासी असून तो सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचा अभ्यास करत होता.