नाशिक : देवळाली कॅम्प भागातील बार्न्स स्कूल आणि महाविद्यालयात जलतरण स्पर्धेवेळी शार्दुल पोळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मूळचा पुण्यातील विश्रामवाडीचा असणारा शार्दुल या महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. देवळाली कॅम्प भागातील नामांकित बार्न्स स्कूल व महाविद्यालयाच्या वसतिगृहात शार्दुल वास्तव्यास होता. महाविद्यालयात मंगळवारी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर पुन्हा स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी शार्दुलने पाण्यात उडी मारली. काही वेळ होऊनही तो पुन्हा वर आला नाही. हे लक्षात येताच त्या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याने तलावात उडी मारून शार्दुलला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडातून शरीरात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात नातवासह आजीचा मृत्यू

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने एका पालकाच्या वाहनातून शार्दुलला लॅम रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर मनीषा बोथरा यांनी तपासून घोषित केले. विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर लागलीच स्पर्धा कशी काय घेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहभागी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन याबाबत नियोजन केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.