लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी, तसेच गुन्ह्यात नातेवाइकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

जयवंत पाटील (५४) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. धुळे जिल्ह्यातील अंचाळे येथील तक्रारदारांवर व त्यांच्या नातेवाइकावर पारोळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात यातील तकारदार व त्यांच्या नातेवाइकांना अटक न करण्यासाठी, तसेच न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी तक्रारदारांकडे ३० हजारांची मागणी करून, २० हजार रुपये घेतले होते.

हेही वाचा… नाशिक शहरात माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करण्याची तयारी; महापालिका विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा

उर्वरित १० हजार रुपये नंतर घेऊन या, असे सांगितले होते. याबाबतची तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी पंचांसमक्ष १० हजारांची मागणी करून तडजोडअंती आठ हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक पाटील यास पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sub inspector of parola police station caught in bribery case in jalgaon dvr