लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरील दरीत मागील आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगाराची बस कोसळली होती. तेव्हापासून बस त्याच ठिकाणी होती. बुधवारी चार मोठ्या क्रेनच्या मदतीने बस दरीतून बाहेर काढण्यात यश आले. अपघातग्रस्त बस महामंडळाच्या ताब्यात आल्याने पुढील तपासाची दिशा स्पष्ट होऊ शकेल.

बुलढाणा आगाराची खामगाव बस १२ जुलै रोजी सप्तश्रृंग गडावरील घाटातील गणपती टप्पा भागात दरीत कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. चालकाला घाट वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा-भुसावळ: हतनूरच्या ४१ दरवाजांमधून विसर्ग

दरम्यान, दरीत पडलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न बुधवारी करण्यात आले. चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सुमारे ३०० फुट दरीत गेलेली बस काढण्यात आली. हे काम सुरू असतांना १० किलोमीटर घाटाचा रस्ता बंद करण्यात आला होता. बस काढण्याचा प्रयत्न दोन ते तीन दिवसांपासून करण्यात येत होता. परंतु, बस चिखलात असल्याने काढण्यात अडचण निर्माण होऊन क्रेनचा रोप तुटत होता. त्यामुळे बुधवारी महामंडळाने चार मोठ्या क्रेन आणून बस काढली. हे काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. गुरूवारपासून वाहतूक नियमितपणे सुरू राहील. यापुढे अशी घटना घडु नये यासाठी घाटात सूचना फलक आणि संरक्षक भिंती बांधण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.