नाशिक – सकल मराठा समाजाच्या विरोधाची झळ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसली आहे. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने (सावाना) मंगळवारी मुनगंटीवार यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने सन्मानित केले जाणार होते. मराठा समाजातील उपोषणकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीला होणाऱ्या कार्यक्रमास आक्षेप घेतल्याने सावानाने हा कार्यक्रम स्थगित केला आहे.

येथील शिवतीर्थावर ४५ दिवसांपासून सुरू असलेले मराठा आंदोलकांचे साखळी उपोषण आता आमरण उपोषणात परावर्तीत करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन येथील उपोषणकर्ते नाना बच्छाव हे आमरण उपोषणास बसले आहेत. राजकीय नेत्यांनी गाव व शहरात कार्यक्रम घेऊ नये, असा इशारा आधीच देण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रविवारपासून कार्यकर्ते गावोगावी मराठा समाजाशी चर्चा करून जनजागृतीद्वारे आंदोलनात लोकसहभाग वाढविणार आहेत, गाव शहरात मंत्री, पुढाऱ्यांना बंदी असून आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी शहर व गावात कुठलाही कार्यक्रम घेऊ नये. काही विपरीत घडल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मंगळवारी कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी यंदा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड झाली आहे.

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
award wapsee marathi news
Award Wapsee: ‘पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या’, संसदीय समितीची शिफारस, निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप!
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
Manohar joshi Sushil Modi Bhulai bhai
मनोहर जोशी ते सुशील मोदी; भाजपा व एनडीएशी संबंधित कोणकोणत्या नेत्यांना मिळाला पद्म पुरस्कार?
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

हेही वाचा – बुलढाणा : देशातील एकमेव जगदंबा उत्सवास थाटात प्रारंभ; ११५ वर्षांची वैभवशाली परंपरा

हेही वाचा – नागपूर : १३५ कलाकार १२ तास शास्त्रीय नृत्यातून करणार अखंड घुंगरू नाद

या कार्यक्रमाची माहिती समजल्यानंतर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावानाशी संपर्क साधला. मराठा आरक्षणासाठी शहर व गावात मंत्री व राजकीय नेत्यांना बंदी असताना आपण मुनगंटीवार यांना कार्यक्रमास कसे निमंत्रित केले, याबाबत विचारणा केली. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा कार्यक्रम थांबविण्याची मागणी केली होती. या घटनाक्रमानंतर सावानाचे सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी मराठा समाजाच्या आवाहनानुसार मंगळवारी आयोजित कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.

Story img Loader