नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. मात्र सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म आला असतानाही त्यांनी माघार घेत आपला अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म आलेला असतानाही स्वतःची उमेदवारी मागे घेत मुलाचा अर्ज का दाखल केला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर सुधीर तांबेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सुधीर तांबे म्हणाले, “काँग्रेसकडून मी तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळी मी अपक्ष उमेदवार होतो. पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा एक वेगळा मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघातून सत्यजीत तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”

Sunil Shelke, Mauli Dabhade, Congress leader suspended
अजितदादांच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणे काँग्रेस नेत्याला भोवले, सहा वर्षासाठी निलंबन
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “लीड कितीचा असेल हे…”, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
devendra fadnavis filled nonamination
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन; मविआला लक्ष्य करत म्हणाले, “लाडक्या बहिणी विरोधकांना…”
vinod tawde kisan kathore
“मताधिक्य द्या, कथोरे मंत्रिमंडळात दिसतील”, विनोद तावडेंचे सूचक विधान, किसन कथोरेंनी भरला अर्ज
chhagan bhujbal on sameer bhujbal
समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढवणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
ajit pawar to file nomination from baramati assembly seat
अजित पवार येत्या सोमवारी अर्ज दाखल करणार; बारामतीत काकापुतण्यामध्ये लढतीची शक्यता

“सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे,” अशी माहिती सुधीर तांबेंनी दिली.

हेही वाचा : उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे”

सुधीर तांबे पुढे म्हणाले, “आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं.”

हेही वाचा : फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

“…म्हणून माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”

“शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत,” असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “आम्हाला सतरंजा उचलायला ठेवलं का?”, नाना पटोलेंच्या स्वबळाच्या वक्तव्यावर अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले….

“सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील”

“सत्यजीत तांबे हे एक चांगलं नेतृत्व आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्याही पलिकडे विचार करावा लागतो. सर्वच पक्ष तसा विचार करत असतात. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं.