लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी तृतीयपंथीयांसाठी रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावे, त्यांच्यासाठी विविध माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस गमे यांनी मार्गदर्शन केले. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. प्रत्यक्ष बैठकीस उपायुक्त रमेश काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, समाज कल्याणचे सहायक संचालक शरद गायकवाड ,अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सहायक आयुक्त (समाजकल्याण) देविदास नांदगावकर आदी यावेळी उपस्थित होते. गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे, या कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विभागात तृतीयपंथीयांची संख्या ५०८ असून ३०५ जणांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
आणखी वाचा-नाशिक: कुरिअर वाहन दरोड्यातील ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी जप्त
विभागीय आयुक्त गमे यांनी, तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करणे आणि त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शैक्षणिक प्रयोजनार्थ विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आणि इतर बाबींच्या अनुषंगाने शासनास माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी समाज कल्याण विभागास दिले.
यावेळी विभागीय समितीच्या सहअध्यक्षा शभिना पाटील (जळगाव), सदस्य दिशा पिंकी शेख (अहमदनगर), चांद सरवर तडवी (जळगाव), प्रा. जयश्री खरे यांनी तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी व सामाजिक प्रश्नांविषयी माहिती दिली. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी सामाजिक दायित्व निधीतून योजना राबवणे आणि घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी सांगितले.